बातमीदार: रोहित खर्गे (विभागीय संपादक)
प्रत्यक्ष भेटून साधला नागरिकांशी संवाद
पिंपरी: २६ सप्टेंबर, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेमार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक घरांमध्ये स्वयंसेवक भेटी देत आहे. या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
प्रभाग क्र 26 पिंपळे निलख-कस्पटे वस्ती परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिके मार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम राबवली जाते आहे.
या मोहीमेत महापौर सौ.उषाताई ढोरे यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांची विचारपूस केली. यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे उपस्थित होत्या. यावेळी विशाल नगर भागातील नागरिकांची तपासणी करून नागरीकांशी संवाद साधला.